

Cultural Significance of Root Vegetables India
esakal
उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय यांच्यात अनेक बाबतींत मतभेद असतील; भाषेचे, संस्कृतीचे, खाद्यपरंपरेचेही... पण बटाट्याच्या ठिकाणी हे सारे वाद जणू विरघळून जातात. उत्तर भारतातला ‘आलू पराठा’ केरळमध्येही तितक्याच चवीनं खाल्ला जातो आणि दक्षिणेकडचा मसाला डोसा, आत गच्च भरलेल्या बटाट्याच्या भाजीसह, दिल्ली-मुंबईतही तेवढ्याच दिमाखात ताटात विराजमान होतो. भारतीयांनी एवढी सहज एकात्मता अन्य कोणत्या खाद्यपदार्थाच्या बाबतीत क्वचितच दाखवली असेल.
बायको काही दिवसांसाठी माहेरी गेली होती. घरातली खरेदीही अनेक दिवसांपासून रखडलेली होती. कित्येक दिवसांनी स्वयंपाकघरात प्रवेश केला. फ्रिजचं दार उघडलं; भाज्यांचा कप्पा रिकामा! ‘अरे देवा, झाली पंचाईत!’ मग स्वयंपाकघरातल्या कांद्याच्या टोपलीकडे नजर गेली; तीही रिकामी. बाजूलाच बटाट्यांची टोपली होती; पण त्यात एकही बटाटा नव्हता. म्हणजे आता बाजारात जाणं अपरिहार्यच होतं. भाज्यांची पिशवी उचलून मी बाजाराच्या दिशेनं चालू लागलो. पहिल्या दुकानात गेलो; सगळ्या भाज्या होत्या, पण बटाटा नव्हता. दुसऱ्या दुकानातही तेच. अजून एक दुकान, अजून एक दुकान... संपूर्ण बाजार फिरून झाला, पण बटाट्याचा काही थांगपत्ता नाही! एवढ्यात मोबाईलची रिंगटोन वाजली. बायकोचा फोन होता.