भ्रमंती। जयवंत राऊत
...शेवटी आम्ही व्ह्यू पॉइंट गाठला. थोड्यावेळाने धुके हळूहळू बाजूला होत गेले आणि कांचनजुंगाचे तेजस्वी रूप समोर आले. त्याक्षणी कुणाच्याच तोंडून शब्द निघाले नाहीत, होती फक्त निःशब्द शांतता...
सिक्कीममधील गोएचा ला ट्रेक हा सर्वात निसर्गरम्य आणि थरारक ट्रेक्सपैकी एक मानला जातो, कारण हा ट्रेक कांचनजुंगा राष्ट्रीय उद्यानातून जाणारा कठीण श्रेणीतील ट्रेक आहे. हिमालयाच्या, विशेषतः कांचनजुंगा परिसराच्या चित्तथरारक निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जाणारा गोएचा ला ट्रेक आपल्याला जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर असलेल्या कांचनजुंगा पर्वताच्या जवळ घेऊन जातो. या ट्रेकमध्ये घनदाट सदाहरित जंगले, नदीवरचे झुलते पूल, बौद्ध मठ आणि हिरवीगार कुरणे अशा सर्वांगसुंदर भूप्रदेशांचे दर्शन घडते.