व्यायामाची साथ । डॉ. वर्षा वर्तक
टाचदुखी म्हणजेच अकिलीस टेंडनाइटीस हे बऱ्याच जणांना भेडसावणारं दुखणं आहे. ही टाचदुखी नेमकी कशी सुरू होते?
- अशा प्रकारच्या टाचदुखीची सुरुवात पायाच्या मागील भागात पोटरीपासून सुरू होते. पोटरीचे स्नायू टेंडॉनच्या बँडनं पायाच्या मागच्या भागातून टाचेच्या हाडापर्यंत जोडलेले असतात. त्यांच्या साहाय्यानं आपण चालणं, पळणं, उड्या मारणं अशा क्रिया करत असतो. या टेंडॉनला जर काही कारणानं दुखापत झाली, तर पळणं-उड्या मारणं तर सोडाच, पण साधं चालणंही अवघड होतं.