

Ancient Indian Monuments and Burial Mounds
esakal
जवळचे शहर : दिल्ली
जवळचे विमानतळ : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली
जवळचे रेल्वेस्थानक : हजरत निजामुद्दीन जंक्शन
केव्हा जाल? : ऑक्टोबर ते मार्च
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : दिल्लीपासून १८ किलोमीटर अंतरावर असणारा मेहेरोली येथील तब्बल ७२ मीटर उंची असणारा हा जगप्रसिद्ध मनोरा. वालुकाश्म आणि संगमरवर यांचा वापर करून बांधलेला आणि सुबक शिलालेखांच्या पट्ट्यांनी कोरलेला कुतुबमिनार हा भारतातील सर्वात उंच दगडी मनोरा आहे. ह्या मनोऱ्याचे बांधकाम मामलूक घराण्याचा सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने ११९९मध्ये आपल्या विजयश्रीचे प्रतीक म्हणून सुरू केले. पुढे त्याचा उत्तराधिकारी सुलतान अल्तमश याने १२३०मध्ये ह्या मनोऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. नंतरच्या काळात फिरोजशहा तुघलकाने १३६८मध्ये मनोऱ्याची डागडुजी करून त्यावर पाचवा मजला बांधला. भारतात इस्लामी सत्ता स्थिर झाल्यावर पर्शियन शैलीत बांधण्यात आलेली ही पहिलीच उल्लेखनीय वास्तू. या मनोऱ्याच्या रचनेवर भारतीय वास्तुशैलीचादेखील प्रभाव दिसतो. याच आवारात ‘कुव्वत-उल्-इस्लाम’ नावाची सुंदर मशीद आहे. या मशिदीद्वारे पश्चिम आशियात विकसित झालेली इस्लामी वास्तुकलेची अभिजात शैली भारतात आली. या मनोऱ्याचे खालचे तीन मजले तांबड्या-पिवळ्या वालुकाश्मात आहेत, तर वरचे दोन मजले पांढऱ्या संगमरवरात आहेत. मनोऱ्यावर सुंदर अक्षरांमध्ये कुराणातील वचने ‘अरेबस्क’ नक्षीप्रकाराच्या माध्यमातून कोरली आहेत. ह्या मनोऱ्यास ३७६ पायऱ्या असून, येथे पुरेशी हवा व उजेड आहे. मनोऱ्यामधून आजूबाजूच्या अफाट परिसराचे दर्शन होते.