Premium|AI Smart Glasses : स्मार्ट उपकरणे; सोय की धोका?

Privacy and Smart Devices : एआयवर चालणारे स्मार्ट चष्मे, स्मार्ट उपकरणे आणि कनेक्टेड तंत्रज्ञानामुळे गोपनीयता, सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक माहितीच्या संरक्षणासमोर निर्माण होत असलेल्या नव्या आव्हानांचा सखोल वेध घेणारा लेख.
Privacy and Smart Devices

Privacy and Smart Devices

esakal

Updated on

अतुल कहाते

आजकाल आपण मोबाईल, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच, स्मार्ट कॅमेरा, स्मार्ट लॉक, स्मार्ट कार, इलेक्ट्रिक वाहने आणि आता एआयवर चालणारे स्मार्ट चष्मे अशा अनेक उपकरणांनी वेढले गेलो आहोत. ही साधने आपले जीवन नक्कीच सोपे करतात, पण प्रत्येक नवीन सोयीसोबत काही नवीन धोकेही येतात. काही दिवसांपूर्वी एआयवर चालणाऱ्या स्मार्ट चष्म्यांबद्दल गोपनीयतेचे प्रश्‍न चर्चेत आले. त्याच काळात भारतात काही ठिकाणी चिनी बनावटीच्या इलेक्ट्रिक रिक्षा दूरवरून बंद पाडल्याचा दावा करण्यात आला. अशा घटना ऐकल्या की एक प्रश्‍न पडतो - ही उपकरणे आपल्या नियंत्रणात आहेत, की आपण त्यांच्या?

हा विषय समजून घेताना घाबरण्याची गरज नाही. पण अंधविश्‍वास ठेवण्याचीही गरज नाही. तंत्रज्ञानाचा वापर करायचा, पण डोळे उघडे ठेवून!

सुरुवात करू या स्मार्ट चष्म्यांपासून. काही कंपन्यांनी असे चष्मे तयार केले आहेत की ते फोटो काढू शकतात, व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात, आवाज ऐकू शकतात आणि एआयच्या मदतीने अनेक प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकतात. वापरणाऱ्याला हे खूप सोयीचे वाटते. रस्ता शोधणे, भाषांतर करणे, माहिती मिळवणे किंवा फोन न काढताच कामे करणे सहज शक्य होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com