Roland Garros 2025 : स्पेनचा कार्लोस अल्काराझ याने फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत तीन चॅम्पिय नशिप पॉइंट्स वाचवत ५ तास २९ मिनिटांच्या ऐतिहासिक लढतीत यानिक सिनरला पराभूत करत जबरदस्त जिद्दीनं विजेतेपद पटकावलं.
कार्लोस अल्काराझ हे रसायनच भन्नाट आहे. शेवटपर्यंत तो पराभूत मानसिकता स्वीकारत नाही, उलट त्वेषाने उसळी घेतो. पॅरिसमधील रोलाँ गॅरोवर रंगलेल्या अंतिम लढतीत तब्बल ५ तास २९ मिनिटांतील संघर्षात अल्काराझने विजय खेचून आणला!