

The Musician's Intimate Bond with the Instrument
Sakal
राधिका परांजपे-खाडिलकर
सगळेच हौशी वादक त्यांच्या वाद्याकडे स्वतःच्याच एका वेगळ्या रूपाला भेटण्यासाठीचं साधन म्हणून बघतात. त्यांच्या दृष्टीनं स्वतःचीच स्वतःला नव्यानं ओळख करून देण्याचं काम ही वाद्यं करतात. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातली उणी-दुणी त्यांना दिसतात, ती या वाद्यसाधनेमुळे आणि त्यावर हे वादक मात करतात, तेही वाद्यसाधनेमुळेच! या विषयावर गप्पा झालेल्या या काही निवडक आणि यांच्यासारख्याच अनेक हौशी वादकांचं हे हळवं, हळुवार नातं असंच फुलत जावो!