America : एकंदरीत अमेरिका सुंदर व प्रगतिशील असा देश, पण अमेरिकेत जिवंतपणा नाही...

नातवाच्या मुंजीसाठी पुण्याहून अमेरिकेला निघालो होतो. मुंबईत आल्यावर एअरलाइनचा फोन आला, की तुम्ही अमेरिकेत खोबरे नेऊ शकत नाही..
american home
american homeesakal
Updated on

अमेरिका म्हटली की एक ठरावीक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तिथला वर्णद्वेष, शाळांमध्ये होणारे अंदाधुंद गोळीबार, ड्रग्ज वगैरे. पण...

अविनाश देशपांडे

शिकागोत पेडेस्ट्रियन रस्त्याने चालणाऱ्यांना चुकवत सायकलिंग करता येते. त्यामुळे रस्त्यावर सायकल चालवायची भीती नाही, एकदम सेफ. जागोजागी सायकलिंग करताना रस्ता ओलांडायला सोय. तोपर्यंत कारने जाणारे थांबतात, हे विशेष.

नातवाच्या मुंजीसाठी पुण्याहून अमेरिकेला निघालो होतो. मुंबईत आल्यावर एअरलाइनचा फोन आला, की तुम्ही अमेरिकेत खोबरे नेऊ शकत नाही, तुमच्या चेक इन बॅगेत खोबरे आहे.

मुंजीसाठी लागेल म्हणून सुनेने आणायला सांगितले होते. माझ्या बायकोने बॅगेतील खोबरे काढले व बॅग दिली. अबू धाबीला अमेरिकेचे इमिग्रेशन होते.

तिथे बॅग मुंबईहून आली की नाही, ते तपासून सांगतो, तोपर्यंत बसा, असे आम्हाला सांगण्यात आले.

आता आली का पंचाईत? कारण मुंजीचे सगळे सामान त्या एकाच बॅगेत होते, तीच आली नाही तर... पण थोड्या वेळाने ती बॅग आली आहे व तुम्ही पुढचा प्रवास करू शकता, असा निरोप आला. त्यामुळे जीव भांड्यात पडला व अमेरिकेचा प्रवास सुखकर झाला.

अमेरिका म्हटली की एक ठरावीक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तिथला वर्णद्वेष, शाळांमध्ये होणारे अंदाधुंद गोळीबार, ड्रग्ज वगैरे.

पण तिथे आपल्यासारखीच हाडामांसाचे लोक राहतात व त्यांनादेखील शांतता तितकीच प्रिय आहे, हे विसरून कसे चालेल? या भेटीनिमित्ताने पुन्हा एकदा अमेरिका अनुभवता आली, आणि माझा दृष्टिकोन बदलला.

शिकागोला पोहोचल्यावर तिथे प्रगतीचे जणू वारेच वाहत आहे असे वाटते. एका ॲमेझॉन फ्रेशच्या दुकानात गेलो. रेग्युलर ट्रॉलीसारखीच, पण ई-ट्रॉली -वस्तू ट्रॉलीत ॲड केली की ऑनलाइन बिल ट्रॉलीच्या स्क्रीनवर बघता येते.

वस्तू घेत जाऊ तसे बिल वाढत जाते. वस्तू कमी केली किंवा काढून घेतली की बिल कमी होते. यासाठी सुरुवातीलाच मोबाईल स्कॅन होतो. मोबाईल एका बॅंक अकाउंटशी जोडलेला असतोच. शेवटी सर्व खरेदी झाली, बिल दिले की ई-ट्रॉली स्टोअरच्या बाहेर घेऊन येऊ शकतो.

इथल्या शालेय संस्कृतीविषयीसुद्धा काही नवीन गोष्टी पाहता आल्या, ऐकल्या. एका शाळेला भेट दिली. तिथे ‘बडी’ बेंच होता. म्हणजे काय, तर एखादा मुलगा अथवा मुलगी उदास होऊन, कंटाळून किंवा त्याला/तिला सोबत खेळायला कोणी नसेल, तो/ती ‘बडी’ बेंचवर बसतात.

मग समजा त्याला किंवा तिला बुद्धिबळ येत असेल, तर शेजारीच बुद्धिबळाचा डाव मांडता येईल अशी शाळेतर्फे व्यवस्था आहे. नाहीतर वर्गातील मुले व मुली मिळून या बडीला त्यांच्यात खेळायला घेतात.

याच शाळेच्या जवळच एका बंगल्यात असलेली लहान मुलांना वाचता येतील अशी पुस्तके व बसायला बेंच ही संकल्पना मनात घर करून गेली.

‘वाचाल तर वाचाल’ ही संकल्पना लहान वयातच अंगी बाणवण्याचा एक स्तुत्य उपक्रम आहे, हे जाणवले. या अशा संकल्पना आवडल्या व भारतात कधी येणार याची वाट बघतोय.

अमेरिकेत व विशेषतः शिकागोत सारे काही सुनियोजित आहे, असे वाटले. पार्सलने आलेले सामान घराबाहेर दारावरची बेल न वाजवता ठेवले जाते.

आपण सवड होईल, त्यानुसार दार उघडून पार्सल घ्यायचे. पार्सलला कोणीही हात लावत नाही की लंपास करत नाही. एखाद्याच्या दारातल्या झाडावरची फुले दिवसेंदिवस झाडावरच आढळतात, हे अतर्क्य म्हणावे लागेल. याची भारतीयांना सवय नाही.

शिकागोत आम्ही सर्वप्रथम सेंटेनिअल बीचवर फिरायला गेलो होतो. स्टार्व्ह्ड रॉक स्टेट पार्कलाही गेलो होतो. पण वेळेअभावी आम्ही सगळे पॉइंट बघू शकलो नाही. सगळे पॉइंट बघायला साधारण संध्याकाळ उजाडली असती.

पण त्यातल्या त्यात फ्रेंच कॅनियन, लव्हर्स लूप आणि स्टार्व्ह्ड रॉक हे तीन पॉइंट बघितले. लव्हर्स लूपवरून निसर्गाचे आगळे-वेगळे रूप बघायला मिळालं. ते फोटोत कैद करण्याचा प्रयत्न केला आहे. स्टार्व्ह्ड रॉक तळ्याच्या पलीकडे होते. निसर्ग ‘ॲट इट्स बेस्ट’ आहे असे वाटले.

आपण मुंबई-पुण्याहून सातारच्या कास पठारावर निसर्गाची उधळण बघायला जातो. पण शिकागोत जागोजागी कास पठारं बघायला मिळतात.

काही महिन्यांनी बर्फ पडणार आहे, हे माहिती असूनसुद्धा अमेरिकी बंगल्यांच्या भोवती उन्हाळ्यात विविध प्रकारची फुले लावतात.

पण ही जीवनाची कला आहे, जी इथले लोक भरभरून जगतात. बर्फ पडायला लागला, पानगळ सुरू झाली की आपोआपच वातावरण निरुत्साही किंवा नैराश्यपूर्ण होते. पण हा त्यांच्या जीवनाचा भाग आहे.

शिकागोत उन्हाळ्यात पाऊस कधी पडेल हे सांगता येत नाही. ‘घडी में शोला...’ इथल्या वेधशाळेचे अंदाज अगदी बरोबर असतात. इथे नियमांची पायमल्ली अजिबात खपवली जात नाही.

चालताना अथवा पाळलेले प्राणी (विशेषतः कुत्रा) फिरायला नेताना नियमांचे पालन केले जाते. कारण बाळकडूच त्याप्रमाणे असते. शिस्त एके शिस्त.

एवढे असूनही अमेरिकेत जिवंतपणा नाही, असे जाणवले. टुमदार घरे, साफसूफ रस्ते, पण गल्ल्या मात्र भकास. हवेत थोडा जडपणा जाणवतो.

त्यामुळे थोडेसे चालले , थोडेसे सायकलिंग केले की दम लागतो. क्वचित हवेतील ओझोनचा हा परिणाम असावा. पण अमेरिकी लोकांना याची सवय असावी.

इथले लोक नियमित सायकलिंग करताना दिसतात. तिथे मुलाची व सुनेची अशा दोन सायकली होत्या. घरून साधारण दहा किलोमीटर येऊन-जाऊन अशा व जेथे बरेच सायकलिस्ट व्यायामासाठी येतात, त्या पार्कवर मी तिथे असताना सायकलिंग करण्यास जात असे.

सुरुवातीला मुलाबरोबर शनिवार-रविवार गेलो. एकदा रस्ता समजल्यावर एकटाच जात होतो. तसेच एके दिवशी सायकलिंग करत साधारण पाच किलोमीटर येऊन-जाऊन अशा रिव्हर ट्रेलला गेलो होतो.

फक्त अट एवढीच की ८७वा स्ट्रीट सोडायचा नाही. अमेरिकेत, विशेषतः शिकागोत पेडेस्ट्रियन रस्त्याने चालणाऱ्यांना चुकवत सायकलिंग करता येते.

त्यामुळे रस्त्यावर सायकल चालवायची भीती नाही, एकदम सेफ. जागोजागी सायकलिंग करताना रस्ता ओलांडायला सोय. तोपर्यंत कारने जाणारे थांबतात, हे विशेष.

भेळपुरीचे स्टॉल, अनधिकृत भाजीवाले यांची बजबजपुरी या रस्त्यावर नाही ही सुखद बाब वाटली. अमेरिकेत गरिबी व बेरोजगारी आहे, पण नियम म्हणजे नियम. भारतात प्रत्यक्षात न येणारी संकल्पना उराशी बाळगत सायकलिंग करत होतो.

आपल्याकडील बेशिस्त व्यवस्थेला कंटाळून क्वचित ज्यांना शक्य आहे, ती मुले परदेशी राहणे पसंत करत असतील, असा विचार मनात डोकावून गेला.

नाही म्हटले तरी भारताशी बरोबरी किंवा तुलना मनातल्या मनात झालीच. आपलाही देश असा प्रगत झाला तर, कुणाला आवडणार नाही? असो. भारतात सायकलिंग करणे हे एक दिव्य आहे याची प्रचिती आली.

american home
America President : "हिंदूंनी ठरवलं तर ते अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष ठरवू शकतात"

आपल्याकडे घरकामात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या बायका जशा सहज मिळतात, तशा अमेरिकेत मिळत नाहीत, त्यांचे पगार परवडणारे नसतात.

त्यामुळे स्वतःच घरातले काम करणे परवडते व वेळ सत्कारणी लागतो. मी माझ्या मुलाच्या घरासमोरील केर काढत होतो.

कारण अमेरिकेत स्वतःच्या घरासमोरील, मागील गवत तुमचे तुम्हीच कापायचे. पेडेस्ट्रियन रस्ता, विशेषतः पानगळीच्या काळात, तुम्ही स्वच्छ करायचा. बर्फ असल्यास तोही स्वच्छ करणे अपेक्षित आहे.

नाहीतर शेजारी तक्रार करतात व त्याची योग्य दखल सरकार दरबारी घेतली जाते व दंड भरावा लागतो तो वेगळाच. तर अमेरिकेत अपना हात जगन्नाथ व त्याचा कमीपणा नाही.

उलट शेजारी तुम्ही किती मेहनत घेता वगैरे कौतुक करतात, ते वेगळे.

तर इथली दिवसेंदिवस प्रगती कशी करता येईल, हे उद्दिष्ट असणारी संस्कृती भावली. मुंबईप्रमाणेच ज्याची मेहनत व सचोटीने प्रयत्न करण्याची तयारी असेल असे वातावरण आवडले. इथले लोक खूश आहेत व शांतताप्रिय व सर्वसामान्य अपेक्षा असलेले आहेत.

एकंदरीत अमेरिका सुंदर व प्रगतिशील असा देश आहे, जिथे माणसाला व त्याच्या असण्याला जास्त प्राधान्य दिले जाते.

पण तरीही ‘सगळं अमेरिकेत आहे छान-छान, पण कुछ दिनों के बाद मेरा भारत देश और उसमें भी पुणं महान’, हेच खरं सनातन सत्य आहे हे जाणवले आणि आम्ही परतलो.

-----------------

american home
America Ashadhi Wari : 'पाऊले चालती…' मराठी माणसाची विठोबा वारी थेट सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com