Premium|Amol Muzumdar Women's Team Coach : महिला क्रिकेटच्या विश्वविजयामागचा ‘गुरु’ अमोल मुजुमदार

India women's cricket World Cup final : एक खेळाडू म्हणून एकलव्य ठरलेले, पण प्रशिक्षक म्हणून शांत, संयमी अमोल मुजुमदार यांनी तंत्रशुद्ध बांधणी आणि कठोर निर्णयांच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वकरंडक जिंकून देण्यात 'गुरु द्रोणाचार्य'ची भूमिका बजावली, ज्यामुळे क्रिकेटच्या खेळात भारताचा 'महाभारत' घडला.
Amol Muzumdar Women's Team Coach

Amol Muzumdar Women's Team Coach

esakal

Updated on

शिरीष डबीर

एक खेळाडू म्हणून अमोल भलेही एकलव्य ठरला असेल, पण प्रशिक्षक म्हणून मात्र तो आपल्या भारतीय महिला संघाचा गुरू द्रोणाचार्य ठरला, ज्यानं विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. एका वेगळ्या अर्थानं युद्धात नाही, तर क्रिकेटच्या खेळात भारताचा ‘महाभारत’ घडवला असं म्हणता येईल!

ता. २ नोव्हेंबरला मर्यादित षटकांच्या विश्वकरंडकावर आपलं नाव कोरून भारतीय महिला क्रिकेट संघानं इतिहास घडवला हे सर्वज्ञात आहेच. त्यामागे सर्व खेळाडूंची अपार मेहनत, कमालीची जिद्द, विजिगीषु वृत्ती, संघभावना त्याग अशा अनेक गोष्टी होत्या. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आणि विभिन्न आर्थिक आणि सामाजिक परिस्थितींतून त्या एकत्र आल्या होत्या. काहींना कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा होता तर काहींना तितकासा नव्हताही, तरीही देशासाठी काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायचं हे स्वप्न प्रत्येकीनं उराशी बाळगलेलं होतं. त्यांच्याबरोबरीनं त्यांचं हेच स्वप्न तितक्याच प्रखरतेनं पण अतिशय शांतपणे, बभ्रा न करता, किंचितशा अलिप्तपणे एका पुरुषानंही पाहिलं होतं. तो म्हणजे त्यांचा प्रशिक्षक अमोल मुजुमदार.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com