Jordan
Esakal
ऋषिकेश पुजारी
जॉर्डनमध्ये पर्यटनासाठी वर्षभर वातावरण चांगले असते, पण मार्च ते मे आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात हवामान अधिक सुखद असते. इतिहास, वाळवंट आणि मृत समुद्र अशा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेल्या जॉर्डनला एकदा तरी अवश्य भेट दिली पाहिजे.
जॉर्डन हा मध्यपूर्वेतील एक अद्भुत देश! इथे तुम्हाला ऐतिहासिक स्थळे, सुंदर वाळवंट आणि मनमोहक निसर्ग यांचे मिश्रण पाहायला मिळते. भारतीय पर्यटकांसाठी तर जॉर्डन थोडे अनएक्सप्लोर्डच आहे. त्यामुळे पुढची ट्रिप प्लॅन करताना जॉर्डनचा विचार करायला हरकत नाही. मुंबई ते अम्मान डायरेक्ट फ्लाइट असल्याने प्रवास सुखकर होतो. रॉयल जॉर्डनची विमाने प्रशस्त आहेत आणि वेळही सोयीची आहे.