car accident
Esakal
दामोदर कुलकर्णी
अपघातानंतर घडलेल्या घटना आणि घरमालकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हे दोन्ही अनुभव माणुसकीचं दर्शन घडवणारे होते. असे अनुभव फार क्वचितच येतात.
गेल्यावर्षी प्रणव आणि दिशा म्हणजेच मुलगा आणि सूनबाईंच्या पहिल्यावहिल्या दिवाळसणासाठी आम्ही तो राहत असलेल्या ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथे मुक्कामी जायचे ठरवले. ऑक्टोबर-नोव्हेंबरचा काळ. मी तर ठरवलेच होते की दिवाळी आणि प्रणवने काढलेली सुट्टी संपली, की लगेच आपल्या देशी परतायचे. तत्पूर्वी तिथली जवळपासची (म्हणजे त्यांच्या दृष्टीनं जवळची बरं!), साधारण पाचशे, सहाशे किलोमीटरपर्यंतची काही प्रेक्षणीय स्थळं बघण्याचं, अनुभवण्याचं ठरवलं.