Premium|Ancient Chaul Trade Port History : प्राचीन चौलच्या व्यापारी वैभवाचा इतिहास पुस्तकातून उलगडला

Ancient Chaul Trade Port History : नवीन म्हात्रे यांच्या पुस्तकातून चौलच्या प्राचीन व्यापारी बंदराचा इतिहास, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा उलगडतो. शिलालेख, ताम्रपट, उत्खनन आणि ऐतिहासिक नोंदींच्या आधारे चौलचा भूतकाळ समजतो.
Ancient Chaul Trade Port History

Ancient Chaul Trade Port History

esakal

Updated on: 

राकेश मोरे - rakesh.more@esakal.com

नवीन म्हात्रे लिखित ‘प्राचीन चौल : व्यापारी बंदराचा इतिहास’ या पुस्तकातून चौलचा प्राचीन इतिहास, व्यापारी महत्त्व, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा उलगडतो. उत्खनन, शिलालेख, ताम्रपट आणि लोककथांच्या आधारे केलेले संशोधनपूर्ण लेखन ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण ठरते.

रायगड जिल्ह्यात अलिबागच्या दक्षिणेला कुंडलिका नदीच्या काठावर चौल हे ऐतिहासिक गाव वसले आहे. प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या गावाचा समृद्ध वारसा नवीन म्हात्रे यांनी ‘प्राचीन चौल : व्यापारी बंदराचा इतिहास’ या पुस्तकातून उलगडला आहे. चौलच्या इतिहासाची इतक्या सविस्तरपणे माहिती देणारे हे पहिलेच पुस्तक असावे. सुमारे १५० वर्षांपूर्वी दा कुन्हा या पोर्तुगीज लेखकाने ‘चौल ॲण्ड वसई’ या विषयावर पुस्तक लिहिले होते. मात्र, चौलचा स्वतंत्रपणे आणि विविध अंगांनी अभ्यास करून त्याचा इतिहास एकत्रितपणे मांडण्याचे महत्त्वाचे काम नवीन म्हात्रे यांनी केले आहे.

प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत चौलचा उल्लेख अनेक ऐतिहासिक नोंदींमध्ये आढळतो. शिलालेख, ताम्रपट आणि उत्खननातून मिळालेल्या अवशेषांमधून या गावाच्या इतिहासाचे पुरावे मिळतात. याशिवाय व्यापाराच्या निमित्ताने चौलला भेट देणाऱ्या परदेशी व्यापारी आणि प्रवाशांनीही आपल्या नोंदींमध्ये या बंदराचा उल्लेख केला आहे. या सर्व साधनांचा अभ्यास करून लेखकाने चौलचा इतिहास मांडला आहे. विविध संदर्भ, प्रवासवर्णने आणि ऐतिहासिक दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतर लेखकाने आपले निष्कर्ष काढल्याचे पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून जाणवते.

Loading content, please wait...