

Ancient Indian Astronomy
esakal
सम्राट कदम
अंतराळ हा मानवाचा कुतूहलाचा विषय. भारतात प्राचीन काळापासून खगोलशास्त्राचा अभ्यास केला जातो. त्यामुळे खगोलशास्त्र शतकानुशतके चालत आलेली समृद्ध ज्ञानपरंपरा आहे. ऋग्वेदातही खगोलीय उल्लेख आढळून आले आहेत. काळ बदलला, विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि भारताने पारंपरिक खगोलज्ञानापासून आधुनिक अंतराळ संशोधनापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास केला. २३ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त जाणून घेऊ या भारताच्या अंतराळक्षेत्रातील प्रवासाविषयी...