evolutions Esakal
साप्ताहिक
सजीवांच्या उत्क्रांतीच्या स्पर्धेत कोणते जीव दीर्घकाळ टिकतात? त्याची कारणे काय? शास्त्रज्ञ याचे विश्लेषण करताना सांगतात..
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी असो किंवा आपली भरभराट होण्यासाठी असो, आपल्याला नेहमीच शिकणे, जुळवून घेणे आणि पुढे जात राहणे ही त्रिसूत्री गरजेची आहे
डॉ. मंदार दातार
सजीवांना निर्जीवांपासून एकदम वेगळे करणाऱ्या लक्षणाचा, पुनरुत्पादनाचा. तुम्हा-आम्हाला शाळेत केलेल्या अभ्यासातून माहितीच आहे, की निसर्गात पुनरुत्पादनाचे दोन ढोबळ प्रकार आहेत; लैंगिक पुनरुत्पादन आणि शाकीय पुनरुत्पादन.
शाकीय पुनरुत्पादनात जन्माला आलेले जीव हे आधीच्या पिढीतील सजीवांच्या हुबेहूब प्रती असतात. गुलाबाच्या किंवा जास्वंदीच्या फांद्या तोडून त्यापासून आलेली रोपे हे याचे उदाहरण.
लैंगिक पुनरुत्पादनात मात्र दोन जीव एकत्र येतात आणि त्यापासून झालेली पिल्ले आपल्या मातापित्याची हुबेहूब प्रत नसतात. ज्या सजीवात लैंगिक पुनरुत्पादन असते, त्यांच्यात बहुतांश करून नर आणि मादी अशी व्यवस्था असते.