

Annapurna Base Camp
esakal
ताडापाणीला पोहोचेपर्यंत सायंकाळ झाली होती आणि पुन्हा धुकं पडलं व पाऊस सुरू झाला. शारीरिक ताकद आणि मानसिक खंबीरपणाची कसोटी सुरू होती. पण प्रत्येक नवीन ठिकाणी पोहोचलो, की थकवा नाहीसा होत असे आणि पुढच्या दिवसाची उत्सुकता जागी होत असे. मजल दरमजल करत अखेर अन्नपूर्णा बेस कॅम्पकडे पोहोचण्याचा दिवस उजाडला. आकाश स्वच्छ निळंशार होतं. हळूहळू जवळ येणारे हिमाच्छादित डोंगर जणू आम्हाला साद घालत होते.