
स्वप्ना साने
त्वचेमध्ये होणारे बदल आपल्याला रोज जाणवत नाहीत; अचानक एके दिवशी लक्षात येते, की डोळ्याभोवती थोड्या सुरकुत्या आल्या आहेत, फाइन लाइन्स दिसतायेत, कपाळावर जरा जास्तच सुरकुत्या तयार झाल्या आहेत, त्वचा काळवंडलीये, चेहरा निस्तेज झालाय... असे बरेच बदल एकदम जाणवायला लागतात. ह्या सगळ्या ‘एजिंग साइन्स’ आहेत अन् ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.