अनुराधा प्रभुदेसाई
लक्ष्य फाउंडेशन ही सैनिकांसाठी विविध उपक्रम आयोजित करणारी आणि भारतीयांमध्ये लष्कराविषयी आत्मीयता निर्माण करण्यासाठी काम करणारी पुण्यातील संस्था. फाउंडेशनच्या संस्थापक अनुराधा प्रभुदेसाई यांना काम करत असताना आलेले काही मोजके अनुभव... काही उत्कंठावर्धक... काही अंतर्मुख करणारे...!
सरत्या वर्षाच्या गुलाबी थंडीत सकाळीच मोबाईलची रिंग वाजली. ‘‘नमस्कार मौसी, फर्स्ट जनवरी को मेरे यहा आना हैं, मार्क करना डायरी में ।’’ ब्रिगेडियर मोहीत घाईत असल्याचे जाणवले. तरी मी त्याला विचारलेच, ‘‘मोहीत एक सवाल है, पंधरा जनवरी आपके लिए क्या मायने रखता है?’’ मोठ्याने हसत तो उत्तरला, ‘‘मौसी, एकदम इंटरव्ह्यू मूड? सिंपल सा जवाब है । मेरे जैसे एक सैनिक के लिए भारत और सेना के प्रति अपने ‘प्रण’ को याद करने का दिन है ।’’ ‘‘और सिव्हिलियन्स के लिए?’’ मी विचारले. ‘‘निश्चित ही अभिमान का क्षण!’’