transformation of AI
Esakal
डॉ. आनंद ज. कुलकर्णी
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आज शेती, रस्ते व विमान वाहतूक, स्मार्ट होम्स, खेळ, उत्पादन, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे संरक्षण ही प्रत्येक देशाची प्राथमिक गरज ठरत आहे. आज कित्येक कंपन्यांतील नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे धोक्यातदेखील आलेल्या आहेत. पण त्याचबरोबर नवनवीन उद्योग आकार घेत आहेत.
तीन वर्षांपूर्वी, म्हणजेच साधारणपणे २०२२मध्ये चॅट जीपीटी अस्तित्वात आले आणि संपूर्ण जगाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे - कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व लक्षात येऊ लागले. ज्याच्याकडे मोबाईल फोन आहे, ती प्रत्येक व्यक्ती आज कळत नकळत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहेच, पण ते प्रगल्भ होण्याकरिता लागणारा डेटादेखील तयार करत आहे. हे देवाणघेवाणीचे नाते दिवसागणिक अधिक मजबूत होत आहे. आज जवळजवळ सर्व क्षेत्रांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनिवार्य होताना दिसत आहे. त्याच्या वापराचे सर्व आयामदेखील बदलत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जन्म व बाल्यावस्थेपासून आजपर्यंतच्या उभारीच्या काळापर्यंतचे संक्रमण अत्यंत रंजक व चित्तवेधक आहे. त्याचा आढावा इथे घेऊ.