सुशील जाधव
वित्तीय संस्थांमधून अनेकविध पातळ्यांवर एआय तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यामुळे प्रातिनिधिक प्रक्रियांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होतो आहे किंवा होईल, तसेच एआय तंत्रज्ञानाचा बँकिंग क्षेत्रावरील प्रभाव व परिणाम जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
आपल्यासाठी आता आर्टिफिशयल इंटेलिजन्स (एआय) हा शब्द काही नवीन राहिलेला नाही. हे तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींमध्ये तर्क, शिक्षण, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे अशा मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असणाऱ्या कृती करण्याची क्षमता असते.
एआय तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात अनेक बदलांची नांदी केली आहे, तशीच आर्थिक क्षेत्रातही केली आहे. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रामध्येही एआय उपयुक्त ठरते आहे.