

Artificial Intelligence Explained
esakal
डॉ. कल्याणी जोशी
आज अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि डेटा सायन्स यांचा व्यापक प्रमाणावर वापर होत आहे. काळाची गरज ओळखून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या तिन्ही क्षेत्रांतील शिक्षणाकडे वळण्याची नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे.
सध्याच्या तंत्रज्ञानप्रधान युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशिन लर्निंग (एमएल) आणि डेटा सायन्स (डीएस) ही क्षेत्रे वेगाने विकसित होत असून विविध उद्योग, व्यवसाय आणि संशोधन क्षेत्रांमध्ये त्यांचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक किंवा यंत्रणांना मानवी बुद्धिमत्तेसारखे कार्य करण्यास सक्षम करणारे तंत्रज्ञान. यामध्ये शिकणे, तर्कशुद्ध विचार करणे, निर्णय घेणे, समस्यांचे निराकरण करणे आणि स्वतःच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे यांचा समावेश होतो. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, कॉम्प्युटर व्हिजन, रोबोटिक्स आणि एक्स्पर्ट सिस्टिम्स यांसारख्या विविध तंत्रज्ञानांचा समावेश कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये होतो. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संगणक मानवी भाषेचा अर्थ समजू शकतात, प्रतिमा ओळखू शकतात, माहितीचे विश्लेषण करू शकतात आणि अनुभवातून शिकू शकतात.