पल्लवी झाकृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आपल्या ऑफिसातली आपला नवी सहकारी असेल आणि साध्या ई-मेल पाठवण्यापासून ते आपल्यासाठी योग्य व्यक्ती हायर करण्यापर्यंत प्रत्येक कामात आपल्याला तिची मदत होईल, असं कधी वाटलं तरी होतं का? .तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती होत असताना, ऑफिसेस आणि तिथल्या कामांच्या पद्धतींमध्येही अनेक बदल होत आहेत. आपल्यापैकी अनेकांनी ह्या बदलांची कल्पनाही केली नसेल. एकेकाळी विज्ञानकाल्पनिकांमध्येच सापडणारी कृत्रिम बुद्धिमत्ता आता जनरेटिव्ह एआय किंवा जेन एआयच्या रूपाने आपल्या दैनंदिन कामाचा एक अविभाज्य भाग झाली आहे. जेन एआय आपल्या ऑफिसातली आपली नवी सहकारी असेल आणि साधा ई-मेल पाठवण्यापासून ते आपल्यासाठी योग्य व्यक्ती हायर करण्यापर्यंत प्रत्येक कामात आपल्याला तिची मदत होईल, असं कधी वाटलं तरी होतं का? या पार्श्वभूमीवर मानव संसाधन (एचआर) क्षेत्र आणि ऑफिसेस -कामाच्या ठिकाणांवर होणारे जेन एआयचे परिणाम अत्यंत दूरगामी असणार आहेत.बदलांची अभूतपूर्व गतीएआय तंत्रज्ञानाची झपाट्याने होणारी प्रगती हा नावीन्याच्या असामान्य गतीचाच पुरावा आहे. चॅटजीपीटीचं उदाहरण घ्या. लॉंच झाल्यानंतर दोनच महिन्यांत चॅटजीपीटीला जवळपास १०० दशलक्ष युझर्स मिळाले. चॅटजीपीटी हा प्लॅटफॉर्म आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारा प्लॅटफॉर्म ठरला. बदलाचा हा वेग मानव संसाधन आणि कार्यस्थळ व्यवस्थापनासह विविध क्षेत्रांमध्ये एआय टूल्सचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापरच अधोरेखित करतो.भरतीप्रक्रियेत क्रांतीऑफिसेसमधील एआयच्या वापराचा सर्वात महत्त्वाचा परिणाम भरती आणि नियुक्ती प्रक्रियांवर झाला आहे. हा बदल क्रांतिकारक आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पारंपरिक भरती प्रक्रियेत अनेक वेळखाऊ कामे असतात. उदाहरणार्थ, उमेदवारांचे अर्ज मागवणे, ते तपासणे आणि मग मुलाखतींचे वेळापत्रक ठरवणे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ही प्रक्रिया आमूलाग्र बदलली आहे. हिल्टनसारख्या कंपन्यांनी या प्रक्रिया ऑटोमेटेड करून त्यांच्याकडील नियुक्त्यांचा वेळ ४३ दिवसांवरून फक्त पाच दिवसांवर आणला आहे. एआय टूल्स उमेदवारांच्या बायोडेटांचं विश्लेषण करतात, कामाचं स्वरूप आणि संस्थेच्या गरजांशी त्यांची तुलना करतात, उमेदवारांची कौशल्ये आणि ते त्या विशिष्ट पदासाठी योग्य आहेत का, याचं मूल्यांकन करतात. यामुळे नियुक्ती प्रक्रियेला गती मिळतेच, पण नियुक्तीची गुणवत्ताही सुधारते. .एआयच्या साहाय्याने उत्पादकतेत वाढउत्पादकता वाढवणे हे एआयचं आणखी एक वैशिष्ट्य ठरत आहे. ग्रामर्ली गो आणि जॅस्पर एआयसारखी टूल्स आशयनिर्मात्यांना आणि विपणकांना कमी वेळात चांगल्या दर्जाचा मजकूर तयार करण्यात मदत करतात. युझरच्या गरजा समजून घेऊन तयार झालेला हा मजकूर व्याकरणदृष्ट्या आणि संदर्भांनुसारही योग्य असतो. त्याचप्रमाणे, पॉवरपॉइंट, एक्सेल आणि आउटलुकसारख्या अॅप्लिकेशन्समध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी, माहितीचं विश्लेषण, ई-मेलचे सारांश आणि मिटिंग्जची तयारी अशा कामांमध्ये मदत करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट को-पायलटसारखी प्रणाली लार्ज लँग्वेज मॉडेल्सचा वापर करते.कामाच्या गुणवत्तेचे व्यवस्थापनपारंपरिक पद्धतीने केलेलं कामाचं पुनरावलोकन व्यक्तिनिष्ठ आणि अनियमित असू शकतं. पण जेन एआयमुळे आता कामाचा नियमितपणे आढावा घेता येतो. यामध्ये अगदी बायोमेट्रिकसह, कामाबद्दलच्या प्रतिक्रिया, त्याचे परिणाम, फायदेतोटे अशा सगळ्या डेटाचं विश्लेषण करता येतं. यामुळे तत्काळ अभिप्राय आणि कामाचं अधिक वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन करण्यात मदत होते आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुधारण्यासाठी सतत वाव मिळतो.मानवी घटकांची गरज ओळखणेया तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असूनही, कामाच्या ठिकाणी एआय वापरणे आव्हानात्मक आहे. एआय टूल्समधील पूर्वग्रह आणि एआयचा आभास- एआय हॅल्युसिनेशन्स (AI Hallucinations) म्हणता येईल अशा घटना या टूल्सचा वापर करताना त्यावर सातत्याने त्यावर लक्ष ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. उदाहरणार्थ, अपूर्ण डेटामुळे मिळत जाणारी चुकीची माहिती. .कर्मचारीकेंद्रित दृष्टिकोनएआयच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एआय संबंधित उपक्रमांची व्यवसाय धोरणांसह रचना करणे, प्रक्रियांची पुनर्रचना करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामगारांचे कौशल्य वाढवणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना एआय टूल्सच्या क्षमतेचा प्रभावीपणे उपयोग करता यावा यासाठी त्यांना सातत्याने प्रशिक्षित करणे आवश्यक ठरते. एआय तंत्रज्ञान तर्काधारित असते. माणसं मात्र दरवेळी तर्काधारित पद्धतीने कामे करतातच असे नाही. ‘आम्ही भावभावना असणाऱ्यांशी व्यवहार करतो आहोत,’ असं अमेरिकी लेखक डेल कार्नेगी म्हणतात, ते इथे लक्षात घ्यायला हवे. जे कर्मचारी एआयच्या बदलत्या जगाला समजून घेतील आणि त्याच्याशी जुळवून घेतील ते एआय टूल्समुळे सतत बदलणाऱ्या ऑफिसेसमध्ये यशस्वी होऊ शकतील.माणसं वर्षानुवर्षे जी कामं करत आलेली आहेत अशी अनेक कामे आज एआय प्रभावीपणे करू शकते. पण तरीही कोणत्याही कामाचं भविष्य हे मूलतः मानवच आहे, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. विश्लेषण आणि ठरवून दिलेली कामं एआयमुळे निश्चितच उत्कृष्टपणे पार पडतात, पण जटिल निर्णय घेण्याच्या, नैतिक परिणामांचा विचार करण्याच्या आणि भावना समजून घेण्याच्या मानवी क्षमतेची जागा एआय घेऊ शकणार नाही. .मानवी सर्जनशीलता, सहानुभूती आणि अनुकूलता यांच्या मिश्रणाद्वारे भविष्यात कर्मचाऱ्यांची व्याख्या केली जाईल. कामाच्या ठिकाणी एआयचा वापर करणे मानव संसाधन विभागासाठी मोठा बदल ठरत आहे आणि त्यामुळे मानव संसाधन विभागाच्या कामाची समीकरणं बदलत आहेत. भरती प्रक्रिया गतिमान करण्यापासून उत्पादकता वाढवणे आणि वैयक्तिक प्रशिक्षण देण्यासाठी एआयची साथ महत्त्वाची ठरते आहे. तांत्रिक प्रगती आणि मानवी सहभाग यांच्यात संतुलन राखण्यावर ऑफिसेसमधील एआयच्या वापराचे यश अवलंबून आहे. बदलांच्या व्यवस्थापनाची प्रभावी पद्धती, एआयच्या मदतीने टिम्सचे कौशल्य आणि श्रेणी सुधारण्यावर लक्ष केंद्रित केल्याने संस्था एआयमुळे झालेल्या बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता सुधारू शकतील आणि भविष्यासाठी तयार असलेला कर्मचारी वर्ग निर्माण करू शकतील.अशा गतिमान वातावरणात आपल्या कार्यप्रणालींचे भविष्य घडविण्यात एआय महत्त्वाची भूमिका बजावेल हे स्पष्ट असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाला माणूस म्हणून फक्त आपल्याकडेच असू शकणाऱ्या क्षमतांची जोड असावीच लागेल.(पल्लवी झा डेल कार्नेगी ट्रेनिंग इंडिया- वालचंद पिपलफर्स्ट लि.च्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका आहेत.)अनुवाद : वैष्णवी कारंजकर- इंगळे------------------.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.