Premium|Mahatma Phule Bicentenary : फुलेंच्या विचारांचा द्विशताब्दी प्रवास; शताब्दी वादंग, सत्यशोधक चळवळ आणि आजच्या महाराष्ट्राची दिशा

Social reforms in Maharashtra : महात्मा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष साजरे होत असताना, १०० वर्षांपूर्वीच्या शताब्दी उत्सवाचा इतिहास प्रेरणादायी आहे. १९२७ मधील पुतळ्याचा संघर्ष आणि आजच्या काळातील त्यांच्या विचारांची निकड यावर प्रकाश टाकणारा हा विशेष लेख.
Social reforms in Maharashtra

Social reforms in Maharashtra

esakal

Updated on

बापूराव घुंगरगांवकर

महात्मा फुले यांच्या जन्माला दोनशे वर्षे पूर्ण होत असताना शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फुलेंच्या कार्याविषयी लोकांमध्ये कशा पद्धतीने जागृती निर्माण होऊ लागली होती, हे लक्षात घ्यायला हवे. महात्मा फुले म्हणतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या जाती-धर्मांतील लोकांनी एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आज त्याच पावलांवर पाऊल ठेवत आपल्याला महात्मा फुले यांच्या विचारांना व कार्याला उजाळा देण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या वाढीसाठी फुलेंचे विचार आजही दिशादर्शक आहेत, यात तिळमात्रही शंका नाही.

ता. ११ एप्रिल २०२६ रोजी महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीला दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे यंदाचे वर्ष महात्मा फुले यांच्या जयंतीची द्विशताब्दी. पुढील वर्षभर शासन आणि सामाजिक स्तरांतून वेगवेगळे कार्यक्रम करून जयंती साजरी केली जाईल, अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. आज द्विशताब्दी जयंती साजरी करताना १९२७मध्ये ‘महात्मा फुले शताब्दी जयंती’ कशी साजरी झाली होती याचा आढावा घेऊ या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com