

Ashes Series
sakal
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेड याने केलेल्या तडफदार आक्रमक शतकामुळे खेळपट्टीवरील टीकेचा सूर काही प्रमाणात सौम्य झाला, तरीही पाच दिवसीय सामना फक्त दोन दिवसांत संपल्याची सल होतीच. त्यामुळेच सामन्याचा मानकरी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या हेड याने बाकी तीन दिवसांसाठी तिकिटे आरक्षित केलेल्या क्रिकेटप्रेमींची माफी मागितली.