Premium|Baddi Pharma Hub : भारताच्या फार्मा उद्योगाला नवी दिशा देणारे बद्दीचे यशस्वी मॉडेल

Asia Pharmaceutical Capital : हिमाचल प्रदेशातील बद्दी हे छोटे गाव आज आशियातील सर्वात मोठे औषधनिर्मिती केंद्र बनले आहे. सरकारी धोरणे, जागतिक दर्जाचे उत्पादन आणि निर्यातक्षमतेमुळे भारताच्या फार्मा उद्योगाला नवी ओळख मिळाली आहे.
Asia Pharmaceutical Capital

Asia Pharmaceutical Capital

esakal

Updated on

भाग्यश्री फडके-धर्माधिकारी

बद्दी येथील औद्योगिक क्षेत्राने शासकीय धोरणे आणि भौगोलिक स्थान यांच्या मदतीने प्रचंड यश मिळविले आहे. सध्या बद्दी हे औषधनिर्मिती केंद्र जागतिक दर्जाच्या डब्ल्यूएचओ व जीएमपीसारख्या सर्वोच्च मानकांसह प्रभावी उत्पादने पुरवते. हे केंद्र जेनेरिक औषधे आणि नावीन्यपूर्ण आरोग्यसेवेसाठीही आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून कार्यरत आहे.

हिमाचल प्रदेश म्हटले, की डोळ्यांसमोर येतात बर्फाच्छादित शिखरे, सफरचंदाच्या बागा आणि नयनरम्य निसर्गसौंदर्य. त्याच हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातले बद्दी हे लहानसे गाव आज आशियातील सर्वात मोठे औषधनिर्मिती केंद्र अर्थात ‘आशियाची औषधनिर्मिती राजधानी’ म्हणून ओळखले जाते. याची कारणे जाणून घेऊ या.

बद्दी येथे दोन हजारांहून अधिक परवानाधारक औषध उत्पादन कारखाने कार्यरत आहेत. त्यामुळे भारतातील एकूण औषधांपैकी ४० टक्क्यांपेक्षा जास्त औषधांचे उत्पादन बद्दीमध्ये होते. येथून २००हून अधिक देशांना औषधांचा पुरवठा केला जातो. तिथे खूप मोठ्या प्रमाणावर गोळ्या, कॅप्सूल्स आणि जीवनावश्यक इंजेक्शने तयार केली जातात. त्यामुळे हे गाव आशियातील सर्वात मोठे औषध उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत या प्रदेशात औषधनिर्मिती क्षेत्राने प्रचंड वाढ अनुभवली आहे आणि राज्याच्या जीडीपीमध्येही या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. २०२६पर्यंत भारतीय फार्मा बाजारपेठ जवळपास ४.७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, या प्रचंड बाजारपेठेत बद्दी आघाडीवर आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या २०००मध्ये आलेल्या महत्त्वाकांक्षी धोरणाने ऐतिहासिक बदल घडवून आणला. या धोरणाने बद्दीमधील कारखान्यांना दिलेली अनुकूलता, कमी उत्पादन खर्च आणि उत्कृष्ट वितरण व्यवस्था या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून बद्दी हे गाव आशियातील औषधनिर्मिती राजधानी म्हणून पुढे आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com