

Protein Sources For Gym
esakal
सर्वात प्रथम जिमला जाण्याचा आपला नेमका उद्देश निश्चित करावा. जिमसोबत योग्य संतुलित आहार घेतला, तरच आपले उद्दिष्ट साध्य होते. अनेकदा जिममध्ये वेगवेगळ्या प्रोटीन पावडर्स, इंजेक्शन्स यांचा आग्रह धरला जातो, त्याला स्पष्टपणे नकार द्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही सप्लिमेंट्स, गोळ्या, इंजेक्शन्स घेऊ नयेत, ते आपल्या जीवावर बेतू शकते. जिम आणि आहाराचा समन्वय आणि त्यातील सातत्य तुम्हाला नक्कीच आरोग्यदायी ठेवण्यास मदत करेल.
ध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे स्थूलता आणि तिच्याशी निगडित असलेले मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, पीसीओडी यांसारखे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. यावरचा पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे संतुलित आहार आणि त्याला उत्तम व्यायामाची जोड. व्यायामासाठी जिम हा आजकाल लोकांचा खूप आवडता पर्याय झाला आहे. ‘आम्ही डाएट सुरू करत आहोत आणि जिम कधी सुरू करायचं?’ असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, जिम सुरू करताना डाएटमध्ये काही मूलभूत गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जिम करताना आहाराची काही मूलभूत पथ्यं पाळावी लागतात.