

Menopause and Menstruation Health
esakal
डॉ. गिरीजा वाघ
मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती दोन्हीही स्त्रीच्या जीवनातील नैसर्गिक टप्पे आहेत; जणू स्त्रीच्या जीवनातील नवे अध्याय! अज्ञान दूर करून त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. संतुलित जीवनशैली, मानसिक आधार आणि समाजातील सकारात्मक दृष्टिकोन यामुळे स्त्री अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि आनंदी होऊ शकते.
स्त्रीच्या जीवनातील सर्वात नैसर्गिक प्रवास म्हणजे मासिक पाळी आणि त्यानंतरची रजोनिवृत्ती. हा प्रवास केवळ शारीरिक बदलांचा नसून मानसिक, सामाजिक आणि भावनिक बदलांचाही आहे. अजूनही समाजात या विषयाबद्दल संकोच आणि अज्ञान आहे. म्हणूनच समाजानेसुद्धा मासिक पाळीची नैसर्गिक क्रिया समजून घेण्याची गरज आहे.