Premium|Integrative Yoga Therapy: आधुनिक काळातील नव्या आजारांवर संयुक्त योगोपचार पद्धती कशी उपयोगी ठरते..?

Yoga for Modern Lifestyle Diseases: मधुमेहासाठी धनुरासन, वज्रासन, पवनमुक्तासन, अर्धमत्स्येन्द्रासन ही आसने आणि कपालभाती, भस्रिका हे प्राणायाम प्रकार उपयुक्त ठरू शकतात..
yoga abhyas
yoga abhyasEsakal
Updated on

डॉ. विश्वजित चव्हाण

आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांवर योगोपचार प्रभावी उपाय ठरू शकतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल साधण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदल उपयुक्त ठरतात.

आज आपण प्रगतीच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत असताना आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा घटक असलेले आरोग्य उपेक्षित राहिले आहे. आधुनिक जीवनशैली जरी अधिक वेगवान आणि सोयीची वाटत असली, तरी तिच्यामुळेच आरोग्य समस्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आजारी पडल्यानंतर आपण उपचार घेतो; मात्र आजारीच पडू नये यासाठी आपण कोणती काळजी घेतो का? चुकीच्या सवयी, असंतुलित आहार, तणावपूर्ण जीवन आणि व्यायामाचा अभाव या सर्वांमुळे माणूस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक त्रस्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com