

टेरेसवर बाग करण्यासाठीची आपली सगळी तयारी पूर्ण झाली. पण एक राहिलेच की! आपण झाड कशात लावायचे याची तयारीच नाही केली. आता झाडे लावण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते पर्याय आहेत ते पाहू.
बाजारात कुंड्यांचे (कंटेनर्स किंवा प्लांटर्स) इतके पर्याय उपलब्ध आहेत की आपला नक्कीच गोंधळ उडू शकतो. उदाहरणार्थ, माती, टेराकोटा, काँक्रीट, लाकूड, धातू, प्लॅस्टिक, सिरॅमिक, फायबर ग्लास, रेझिन यांच्या कुंड्या किंवा प्लांटर्स अनेक आकाराच्या आणि वेगवेगळ्या घडणीच्या उपलब्ध असतात. याशिवाय पॉलिबॅग्ज, ग्रो बॅग्ज यांसारखे पर्याय आहेत. तसेच विविध साधनांपासून आणि विविध प्रकारचे वाफेसुद्धा आपण गच्चीवर करू शकतो.