
मैत्रेयी पंडित-दांडेकर
आम्ही जन्मानं अमेरिकन असलो तरी आमच्यातील ‘भारतीय’ जनुकं जिवंत ठेवणं हे मम्माच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचं ध्येय आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यासाठी तिचा अखंड खटाटोप आणि त्याविरोधी आमच्या अखंड लुटुपुटुच्या लढाया सुरूच असतात. मम्मा आमच्यासाठी नाताळबिताळ साजरे करत असली, तरी तिला भारतीय सणांचं विशेष प्रेम आहे हे काही वेगळं सांगायला नको.