Premium|Stock Market Investment Strategy : शेअर बाजारातील घसरणीत गुंतवणूकदारांनी नेमकी कोणती रणनीती वापरावी?

Stock Market Volatility and Stop Loss : शेअर बाजारातील घसरण आणि गुंतवणूकदारांची भीती यावर भूषण महाजन यांचे विवेचन. प्रत्येक तिमाही निकालाचा अभ्यास, योग्य मूल्यांकन आणि स्टॉपलॉसच्या मदतीने गुंतवणुकीतील जोखीम समजून घेण्यावर भर.
Stock Market Volatility and Stop Loss

Stock Market Volatility and Stop Loss

esakal

Updated on: 

भूषण महाजन

विविध आकर्षक गुंतवणुकी शोधून काढाव्या लागतील. त्यासाठी शेअर नजरेच्या टप्प्यात आला, की प्रत्येक तिमाही निकाल सूक्ष्मपणे अभ्यासावा लागेल. थोडा वेळ दिल्यास यश येईलच. त्यात आपले संरक्षण करण्यास स्टॉपलॉस आहेच! मिळकत आणि किंमत यांमधली तफावत शोधली तर सापडते.

शोले चित्रपटातील गब्बरचे वाक्य अजूनही सर्वांना आठवत असेल - जो डर गया, समझो मर गया. आजच्या शेअर बाजारात झालेला मंदीचा व भीतीचा अतिरेक पाहून तोच डायलॉग थोड्याफार फरकाने मनात येतो - जो डर गया, वो डूब गया! याचे कारण म्हणजे, जेव्हा दीर्घकाळ बाळगलेला आपला चांगला शेअर खाली जायला लागतो, तेव्हा तो विकून पुन्हा खाली घ्यावा का, हा विचार सतत डोक्यात येऊ लागतो. रोजच विकावासा वाटतो, पण तोटा सहन करायचा धीर होत नाही. मात्र आपण विकला नाही, म्हणून शेअर खाली जायचा थांबत नाही. दुसऱ्या दिवशीही तीच तऱ्हा! शेवटी जिवावर उदार होऊन विकावे, तर पुढील दोन-तीन दिवसांतच तो पुन्हा वर जातो. सहसा विकलेला शेअर खाली विकत घेणे हे स्वप्न भंग पावते, मग करावे तरी काय?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com