भूषण महाजन
आपली खरेदी चांगल्या खालच्या भावात झाली तर धीर धरण्याचा आत्मविश्वास येतो. अत्यंत चोखंदळपणे ती बँकिंग, फायनान्स, निवडक फार्मा, औषध, वाहन आदी क्षेत्रांत करावी. निकाल संमिश्र आहेत.
हॅम्लेट ही विल्यम शेक्सपिअर यांनी १५९९ ते १६०२च्या दरम्यान लिहिलेली, सर्वात गाजलेली डेन्मार्कचा राजकुमार हॅम्लेट याच्या आयुष्यातील दुःखद घटनांवर बेतलेली एक काल्पनिक शोकांतिका आहे. प्रिन्स हॅम्लेटच्या वडिलांचा त्याच्या काकाने खून केला असतो आणि त्याच्या आईशी लग्न केलेले असते. त्याचा सूड घ्यावा अशी त्याच्या वडिलांची इच्छा असते. त्यासाठी वडिलांचे भूत सतत हॅम्लेटच्या मागे असते. ह्या सततच्या नॅगिंगमुळे त्याला काहीही सुचेनासे होते आणि शेवटी तो कंटाळून म्हणतो, त्रस्त समंधा, तू शांत राहा !
हॅम्लेटचे नाना जोगांनी आणि पुढे आगरकरांनी मराठीत भाषांतर केले व मराठी प्रेक्षकांना शेक्सपिअरचे एक नंबरचे नाटक बघायला मिळाले. हॅम्लेटला वडिलांच्या हत्येचा सूड घ्याचा असतो, पण तो पुरता गोंधळात पडलेला असतो. आईच्या वर्तनाचादेखील त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो. काय करावे त्याला समजत नाही. जगावे की मरावे, ( to be or not to be), हे ह्या नाटकातीलच हॅम्लेटच्या तोंडी असलेले प्रसिद्ध वाक्य.