
प्रकाश सनपूरकर
डॉ. व्यंकटेश मेतन सोलापुरात मागील काही दशकांपासून अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी पक्षी निरीक्षण व पक्ष्यांची छायाचित्रे काढण्याचा छंद जोपासला. देशात आढळणाऱ्या १,३६९ प्रजातींपैकी एक हजार प्रजातींच्या पक्ष्यांना त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले. त्यासाठी त्यांनी देशभरातील विविध प्रदेशांत प्रवास करून छायाचित्रण केले. त्यांच्या पक्षी छायाचित्रांची प्रदर्शने जहांगीर आर्ट गॅलरीपासून बंगळूरसारख्या शहरांसह विविध ठिकाणी झाली आहेत.