Premium|Borra Caves Andhra Pradesh : गोष्टानी नदीच्या उगमाशी निसर्गानं घडवलेलं गूढ कलाकुसरीचं जग- बोर्रा लेणं

Limestone Caves in India : आंध्र प्रदेशातील अनंतगिरी डोंगररांगांमध्ये स्थित बोर्रा लेण्या, गोष्टानी नदीच्या प्रवाहामुळे कार्स्टिक चुनखडकांत तयार झालेल्या असून, त्या लाखो वर्षांच्या भूगर्भातील सौंदर्य, इतिहास आणि अध्यात्माचा संगम आहेत.
Borra Caves Andhra Pradesh

Borra Caves Andhra Pradesh

esakal

Updated on

अमोघ वैद्य

बोर्रा लेण्यांचं निसर्गसौंदर्य आणि भूगर्भातल्या त्या गुप्त विश्वाला अनुभवल्यावर वाटतं, की आपण एका प्राचीन काळातल्या प्रवासाला आलो आहोत. या खोल गुहेत नुसते दगड नाहीत, तर पाण्याच्या श्वासात कोरलेलं हजारो वर्षांचं, सहस्रकाळाचं जणू कधीच संपणार नाही असं एक संगीत आहे. हे संगीत फक्त कानांनी ऐकण्याचं नव्हे, तर मनाच्या खोल कातळात उसळणारं आहे.

कधीकधी मन कातळाच्या खोल खड्ड्यात हरवतं. त्या दगडी कातळाच्या गुहेत खोल काळाच्या काळवंडलेल्या काही रहस्यांचा ठाव लपलेला असतो. आंध्र प्रदेशातील बोर्रा लेण्याकडे पाहताना तसा काहीसा अनुभव येतो. वाहणाऱ्या पाण्याच्या सततच्या प्रवाहानं तिथं लाखो वर्षांपूर्वी एक सुंदर रचना केली. त्या प्रवाहानं एका अशा पवित्र ओढीला जन्म दिला, की तिथं मानवी जीवनानं आपली सुरुवात केली. त्या नितळ सौंदर्यात मधोमध उभं राहून, मनात त्या सहस्रकाळाच्या खोल खोल भिंतीत गढलेल्या प्रवाहाची कल्पना येते - कसा तो प्रवाह कातळाला सुंदर वळणांनी आकार देत गेला असेल बरं. बोर्रा लेणं फक्त दगडी गुहा नाही. त्या खोल खोल कातळांच्या गुहेत संस्कृतीची, अध्यात्माची आणि इतिहासाची साक्ष साठवलेली आहे. त्या गुहेत वास्तवाचा आणि काल्पनिकतेचा संगम आहे, जणू काही तलम दगडाच्या कुशीत मानवी सभ्यतेच्या सुरुवातीच्या कथा जपलेल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com