निकिता कातकाडे
आपल्या रोजच्या जगण्यात काही गोष्टी इतक्या सहज रुजतात, की त्यांचा दुष्परिणाम किती खोलवर असतो हे आपल्याला जाणवतही नाही. प्लॅस्टिकसुद्धा असंच आहे. ब्रशपासून पिशवीपर्यंत, बाटलीपासून डब्यांपर्यंत सगळीकडे प्लॅस्टिकचंच साम्राज्य! आपल्या घरात प्लॅस्टिकच्या एकूण किती वस्तू आहेत याचा कधी विचार केला आहे का? बाथरूममधल्या बॉटल्स, स्वयंपाकघरातले कंटेनर्स, कपाटातल्या पिशव्या, जेवणाचे डबे वगैरे वगैरे..!
सगळीकडेच प्लॅस्टिक वापरण्याची सवय इतकी खोलवर रुतली आहे, की त्यात बदल करणे अशक्यप्राय वाटते. खरेतर हे बदल करणे तितकेसे कठीण नाही. काही साधे उपाय, थोडेसे प्रयत्न पर्यावरणासाठी मोठा फरक घडवून आणू शकतात. सुरुवात घरापासूनच करू या... त्यासाठी काही टिप्स...