Premium|Sports Coaching: नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स
क्रीडा क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम असणारी आणि देशात क्रीडासंस्कृती ठोसपणे रुजवणारी दर्जेदार संस्था म्हणून नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट् स या संस्थेने नावलौकिक प्राप्त केला आहे. या संस्थेत क्रीडा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, उपकरणे, साहित्य उपलब्ध करून दिले जाते. इथे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम करिअरच्या संधी मिळू शकतात.
अभ्यासक्रम
(१) डिप्लोमा इन स्पोर्ट् स कोचिंग
पात्रता : बारावी आणि या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात पुढील कामगिरी बजावलेली असावी : (अ) ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व, (ब) वरिष्ठ जागतिक स्पर्धा सहभाग, (क) कॉमनवेल्थ किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणतेही पदक.
(२) एम.एस्सी. इन स्पोर्ट् स कोचिंग :
हा अभ्यासक्रम पतियाळा येथील कॅम्पसमध्ये चालवला जातो. निवड प्रक्रिया पतियाळा येथे होते. क्रीडा विज्ञानावर आधारित लेखी चाळणी आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाते.