Premium|Cafe Franchise Business : फ्रँचायझी घेताना...

Cafe Franchise Investment Guide : कॅफे फ्रँचायझी घेताना ब्रँडची प्रतिष्ठा, आर्थिक नियोजन, योग्य जागा, करारातील अटी आणि स्थानिक बाजारपेठेची मागणी यांचा सखोल अभ्यास करणे यशासाठी अत्यावश्यक ठरते.
Cafe Franchise Investment Guide

Cafe Franchise Investment Guide

esakal

Updated on

तेजस महाबळ

कॅफे म्हणजे तरुणाईसोबतच लहान-मोठ्या सगळ्यांची आवडती हँगआऊट प्लेस! त्यामुळे कॅफेशी एक बाँड तयार झालेला असतो. तिथल्या कॉफीची चव, तिथला ॲम्बिअन्स हे सगळं समीकरण ‘कॅफे एक्सपिरियन्स’मध्ये भर घालत असतं. तुम्ही एखाद्या कॅफेची फ्रँचायझी घेताना हे सगळं लक्षात घेणं अपेक्षित असतं. तरच तुमची फ्रँचायझी लोकांची आवडती हँगआऊट प्लेस होऊ शकते.

आजकाल रस्त्यारस्त्यांवर दिसणारी कॉफी शॉप्स आणि वाढत चाललेली कॅफे संस्कृती तरुणाईला भुरळ पाडत आहे. हाच वाढता ट्रेंड पाहून अनेकांना स्वतःचं कॅफे सुरू करण्याचे वेध लागतात. त्यातही ‘सेफ पर्याय’ म्हणून बरेचजण एखाद्या ब्रँडची फ्रँचायझी घ्यायचा विचार करतात. मोठ्या ब्रँडचं नाव आधीच तयार असल्यामुळे फ्रँचायझी घेणं हा व्यवसाय सुरू करण्याचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग वाटतो. पण, फक्त आकर्षक ब्रँड नेम किंवा एखाद्या आऊटलेटमध्ये झालेली लोकांची गर्दी पाहून घेतलेला निर्णय भविष्यात महागात पडू शकतो. कोणतंही कॅफे फायद्यात चालवायचं असेल, तर केवळ चांगल्या कॉफीची चव पुरेशी नसते, त्यामागे योग्य आर्थिक गणितं, जागेची निवड आणि कायदेशीर बाबींचं अचूक नियोजन असावं लागतं. म्हणूनच, कॅफे फ्रँचायझीच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि ब्रँडची निवड कशी करावी, याची माहिती सांगण्याचा प्रयत्न...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com