नील पाटील
बेकिंग ही एक कला आहे, आणि केक ही कलाकृती. ही कलाकृती साकारताना बराच वेळ आणि एनर्जी खर्च होत असते. मनापासून कष्ट केल्यावर केक नीट झाला नाही तर आपला पापड मोडतो. त्यामुळे केक करताना रेसिपी काटेकोरपणे फॉलो करणं अतिशय महत्त्वाचं असतं. प्रत्येक इन्ग्रिडियंट तेवढ्याच प्रमाणात वापरला गेला तरच केक चांगला होतो.
अर्थातच परफेक्ट रेसिपी, त्यातली योग्य प्रमाणं, योग्य साचे हे जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच इतर अनेक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणंही गरजेचं असतं. छान स्पॉन्जी केक तयार झाल्यावर तो डेकोरेट करताना, स्टोअर करतानाही विशेष काळजी घ्यावी लागते. केक करताना आणि झाल्यावर फॉलो करता येतील अशा काही टिप्स...