
Career Option : 5
डिजिटल तंत्रामध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीने इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण कल्पना व कौशल्यांचा वापर करणे सुलभ झाले आहे. प्रत्येक सोहळा हा आधीपेक्षा वेगळा कसा होईल याकडे लक्ष पुरवले जात आहे.
त्यामुळे ग्राहकांपर्यंत वस्तू/ सेवा पोहोचवणे अधिक सुलभ होत आहे. त्यामुळे सर्जनशीलता, वेगळा विचार करण्याचे कौशल्य, तंत्रावरची हुकूमत व परिश्रम करण्याची तयारी असणाऱ्या व्यक्तींना या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
पुढील काही वर्षांत या संधी आणखी वाढत जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.