Career In Tea ScienceEakal
साप्ताहिक
Career In Tea Science : चहाची लागवड ते चहाची विक्री; शिका चहाचे शास्त्र.!
चहा लागवड, व्यवस्थापन या क्षेत्रातील कार्यात्मक ज्ञान, कौशल्यप्राप्तीसाठी आणि सध्या या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान, कौशल्यवृध्दी व पुढील प्रगतीसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो
Career Option : 21
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बघावे तिकडे अमृततुल्य चहाचे बोर्ड दिसतात. अमक्या चहापासून तमक्या चहापर्यंत सर्व प्रकारचे चहा त्या बोर्डवर स्थिरावलेले असतात. या सगळ्या ठिकाणी गर्दी असते. यावरून सहज लक्षात येते की सध्या अमृततुल्यांची सर्वत्र चलती आहे. चहाच्या छोट्याशा टपऱ्यांपासून अमृततुल्यांपर्यंतचा प्रवास चहाच्या वाढलेल्या लोकप्रियतेचा पुरावा होय.

