पूजा खंडिझोड
डॉक्टरांचा दिनक्रम इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा अधिक तणावपूर्ण आणि वेळखाऊ असतो. त्यामुळे त्यांना काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन राखणे अत्यंत कठीण होते. या असंतुलनाचे परिणाम केवळ डॉक्टरांवरच नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांवर, नात्यांवर आणि मानसिक आरोग्यावरही होतात.
डॉक्टर हा समाजातील अत्यंत जबाबदार आणि कठोर मेहनत करणारा घटक मानला जातो. त्यांच्या आरोग्य विज्ञानाच्या ज्ञानामुळे आणि कौशल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचतात, जीवनात नवीन आशा निर्माण होते. परंतु, हे चित्र जितके उजळ आहे, तितकाच दुसऱ्या बाजूला काळोखही आहे...
डॉक्टर हा समाजातील एक महत्त्वाचा सेवाभावी स्तंभ आहेत. पण सेवा देणाऱ्या याच डॉक्टरांना स्वतः मात्र अनेक वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर त्यांना शारीरिक व मानसिक समस्यांचाही सामना करावा लागतो. या समस्या केवळ त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रापुरत्या मर्यादित नसून, त्या व्यापक सामाजिक परिस्थितीशी जोडलेल्या असतात.