डॉ. श्रीकांत कार्लेकर
अंदमान आणि निकोबार आयलंड प्रोटेक्शन ऑफ ॲबोरिजिनल ट्राइब्ज रेग्युलेशन या १९५६च्या नियमानुसार बेटावर आणि बेटाच्या पाच नॉटिकल मैलांवर (नऊ किलोमीटर) जाण्यास मनाई आहे. या भागात भारतीय नौदलाची गस्त आहे. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने किनाऱ्यावर पाऊल टाकल्यास सेंटिनेलीज त्याची हत्या करतात!
उर्वरित जगापासून आजपर्यंत अलिप्त आणि अस्पर्शित असलेल्या अंदमान आणि ॲमेझॉनमधल्या वस्त्यांच्या व जमातींच्या दुर्मीळ प्रतिमा ड्रोनने मिळवल्या आहेत. सर्व्हायव्हल इंटरनॅशनल या लंडनमधील संस्थेने १५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या एका नवीन संशोधनात या जमातींचे एक जगावेगळे विश्व समोर आले आहे.
२०१८पासून डेथ आयलंड एक्स्पिडिशन्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संकलनाने संपर्क नसलेल्या जमातींची ३.५ दशलक्षपेक्षा जास्त दुर्मीळ दृश्ये जमा केली. डेथ आयलंड एक्स्पिडिशन्स हे यूट्यूब चॅनल जगातील सर्वांत अलिप्त बेटे, संपर्क नसलेल्या जमाती आणि इतर धोकादायक बेटांबद्दल माहिती व ड्रोन प्रतिमा प्रसिद्ध करत असते.