
Cheteshwar Pujara
Sakal
किशोर पेटकर
भारतीय क्रिकेट संघातील तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी राहुल द्रविडनंतर चेतेश्वर पुजाराने तब्बल तेरा वर्षे समर्थपणे पेलली. कसोटीत ७,१९५ धावा काढतानाच त्याने संघाचा आधारस्तंभ ठरून अनेक लढतींत निर्णायक भूमिका बजावली. आता मात्र हा ३७ वर्षीय फलंदाज निवृत्त झालेला असताना टीम इंडियाला तिसऱ्या क्रमांकावर त्याच्या तोडीचा फलंदाज अजून गवसलेला नाही.