

Marathi Literature on Disasters
esakal
किल्लारी भूकंपात बावन्न गावे उद्ध्वस्त झाली. हजारोजणांचे जीव गेले. हजारो संसार कायमचे उद्ध्वस्त झाले आणि जे जगले, वाचले त्यातल्या कित्येकांनी कायमची हाय खाल्ली. हा धक्का इतका जबरदस्त होता, की लोकांना व्यक्त कसे व्हावे हे समजत नव्हते. चिगूर ही कादंबरी म्हणजे या अव्यक्तांची अभिव्यक्ती आहे. सकाळ प्रकाशनाने घेतलेल्या कादंबरी लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती ठरलेल्या चिगूरमध्ये भूकंपाच्या तडाख्याने लहान, शाळकरी मुलांच्या उद्ध्वस्त झालेल्या भावविश्वाचे प्रतिबिंब आढळते.