

Early Childhood Brain Development
esakal
जशी एखादी इमारत म्हणजे फक्त विटांच्या भिंती नाहीत, त्याबरोबर पाण्याचे, इलेक्ट्रिसिटीचे, ड्रेनेजचे जाळे असते तसेच मुलांचा मेंदूही विविध स्तरांवर विकसित होत असतो. इमारतीला जसा पूर्ण व्हायला विशिष्ट वेळ लागतो तसंच मुलांचा मेंदूही वेळ घेणारच! म्हणूनच कुशल माळ्याप्रमाणे मुलांचा मेंदू सर्वांगाने फुलविण्याचा प्रयत्न करूया.
मूल जेव्हा एका वर्षाचे होते, तेव्हा त्याचा मेंदू जन्माच्या वेळच्या आकारापेक्षा दुप्पट झालेला असतो. वयाच्या तिसऱ्या वर्षाच्या अखेरीस ८० टक्के वाढ झालेली असते आणि पाचव्या वाढदिवसाला मेंदूचा आकार तुमच्या-आमच्या मोठ्यांच्या मेंदूएवढा झालेला असतो. पण याचा अर्थ असा नाही, की पाच वर्षांचे मूल तुम्हा-आम्हा मोठ्यांप्रमाणे विचार करू शकेल किंवा किचकट गणिते सोडवू शकेल. पहिल्या पाच वर्षांत मेंदूची पायाभरणी सुरू असते!