

Children’s Screen Time and Cognitive Development
esakal
गोपाळ कुलकर्णी
मुलांचा वाढता स्क्रीन टाइम जगभरातील संशोधकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. याचे परिणाम केवळ शैक्षणिक बाबींपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्याचा मुलांच्या आकलन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो आहे. एआयच्या वापरामुळे शैक्षणिक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत असताना या नव्या आव्हानाला कशा पद्धतीने सामोरे जायचे, याचे उत्तर आत्ताच शोधावे लागेल. जामा पीडिअॅट्रिक्स या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेले संशोधन सर्वांचेच डोळे उघडणारे आहे. मुलांकडून होणाऱ्या समाज माध्यमांच्या वापराला आळा घातला, तर बरेच सकारात्मक बदल घडून येतील.
ज गभरात दारिद्र्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. विकसशील आफ्रिकी देशांमधील स्थिती नेहमीच संयुक्त राष्ट्रांसारख्या (यूएन) संस्थांसाठी चिंतेचा विषय ठरत आलेली आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी यूएनकडून दरवर्षी काही कोटी डॉलरचा निधी राखून ठेवला जातो. पण त्यामुळे चित्र आमूलाग्र बदलले आहे, असे कधीच होत नाही. विकसनशील देशांमध्ये साधनांच्या उपलब्धतेची समस्या गंभीर रूप धारण करत चाललेली असतानाच विकसित देशांमध्ये नवेच आव्हान उभे ठाकले आहे, ते म्हणजे मुलांच्या हाती आलेल्या मोबाईलसारख्या गॅजेट्सनी त्यांचा वेळ खायला सुरुवात केली आहे. हे दुष्टचक्र एवढ्यावरच थांबत नाही, तर ते त्यांच्या आकलनशक्तीवरही आघात करताना दिसते. गॅजेट्सचा मुलांकडून होणारा वापर आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी यांच्यात निकटचा संबंध असल्याचे उघड झाले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!
आजच सकाळ ॲप डाउनलोड करा