Premium|China Turkmenistan Railway : चिनी महत्त्वाकांक्षेची ‘ड्रॅगन एक्स्प्रेस’

China’s New Railway Route to Central Asia : चीनने तुर्कमेनिस्तानपर्यंत रेल्वेसेवा सुरू करून मध्य आशियातील व्यापारमार्ग अधिक मजबूत केला आहे. बेल्ट अँड रोडच्या माध्यमातून रेल्वेचे वाढते जाळे चीनच्या आर्थिक आणि सामरिक प्रभावाला नवी दिशा देत आहे.
China’s New Railway Route to Central Asia

China’s New Railway Route to Central Asia

esakal

Updated on

मधुबन पिंगळे

चीन ते तुर्कमेनिस्तान ही रेल्वे नुकतीच सुरू झाली आहे. यातून चीन ते मध्य आशियापर्यंतच्या मालवाहतुकीला नवा पर्याय मिळाला आहे. चीनने काही वर्षांमध्ये युरोप, मध्य आशिया आणि आग्नेय आशियापर्यंत रेल्वेमार्ग विकसित केले असून, त्यातून चीनच्या मालवाहतुकीला नवे बळ मिळाले आहे.

जागतिक महासत्ता होण्यासाठी चीन काही दशकांपासून झपाटल्याप्रमाणे कार्यरत असून, प्रत्येक क्षेत्रातून जगावर प्रभाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. त्यासाठीच ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’सारखा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अनेक देशांना पायाभूत सुविधांसाठी दिलेल्या कर्जातून चीनचा कर्जसापळाही आता लपून राहिलेला नाही. त्यामुळेच अनेक देश चीनच्या प्रभावाखाली असून, चीनला त्याचा चांगलाच फायदा होत आहे. या प्रभाव क्षेत्राच्या दृष्टीने चीनने आणखी एक क्षेत्र निर्माण केले आहे, ते म्हणजे रेल्वेमार्ग. चीनमधून सुरू होणारे रेल्वेमार्ग आता युरोप, मध्य आशिया आणि आग्नेय आशियातील देशांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये या देशांना जोडणारे अनेक मार्ग सुरू झाले असून, भविष्यात आणखी देश जोडण्यासाठीही चीन प्रयत्नशील आहे. त्यातून भूप्रदेशावर पर्यायी वाहतूक मार्गांचा विस्तार व्हावा, व्यापार अखंड सुरू राहावा, पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय येऊ नये आणि त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला व्हावा, असे चीनचे धोरण आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कमेनिस्तानला जोडणारी रेल्वेसेवा सुरू झाली असून, यातून तुर्कमेनिस्तानबरोबरच मध्य आशियाबरोबरील चीनचे व्यापारी जाळे आणखी सक्षम होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com