
किशोर पेटकर
२७ वर्षांची प्रतीक्षा संपली! तेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने अखेर ‘चोकर्स’चा शिक्का पुसत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चिकटलेला ‘चोकर्स’ हा नामुष्कीजनक शिक्का पुसून टाकण्यात दक्षिण आफ्रिकेला अखेर तब्बल २७ वर्षांनंतर यश मिळाले. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी पॅट कमिन्स याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया जेतेपदाची गदा मिरवेल याची सर्वांना खात्री होती. तर तेम्बा बवुमा कर्णधार असलेला दक्षिण आफ्रिका संघ डार्क हॉर्स होता - मैदानावर निर्णायक क्षणी हमखास कच खाणारा संघ!