

Senior citizen housing criteria
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
आमची ही वसाहत पाचशे घरांची. त्याला आठ एकरांचं क्लब हाऊस. त्यात सुसज्ज पोहण्याचा तलाव, टेनिससारख्या अनेक क्रीडाप्रकारांची सोय. सर्व रहिवासी अमेरिकी असले, तरी काव्यशास्त्रविनोद, बुक क्लब, जाता-येता डोकावणाऱ्या प्रेमळ शेजारणी, आठवड्यातून एकदा तरी एकत्र जमून होणारी आमची जेवणं, पुस्तकांची आणि पाकक्रियांची देवाणघेवाण, आमच्या घरी होणारे सूर्यनमस्कार आणि आसनांचे वर्ग, एकत्र चालायला जाताना मी त्यांना सांगितलेल्या लक्ष्मीबाई टिळकांच्या आणि आनंदीबाई जोशींच्या गोष्टी... हे उत्तम सुरू होतं.
गेल्या अंकात (ता. ४ एप्रिल) प्रसिद्ध झालेल्या लेखात उत्तररंग वसाहतीची निवड करण्यासाठी आम्ही काय केले ते लिहिले होते. त्याचा सारांश म्हणजे, आम्ही उत्तररंगाच्या अवस्था, त्यानुसार गरजा पुरवणाऱ्या वसाहतींचे प्रकार आणि आपली लाइफस्टाइल कशी असायला हवी याचा विचार केला होता. त्यानुसार वसाहतीच्या प्रकारांची विभागणी करून ५५ प्लस अथवा ॲक्टिव्ह ॲडल्ट कम्युनिटी ही आमच्यासाठी योग्य असा विचार का केला ते सांगितले. आणि अशा प्रकारच्या वसाहतींची पाहणी करून त्यातील एक निवडण्याचे आमचे निकषदेखील सांगितले. या लेखात आम्ही ते सर्व निकष, त्यांचे प्राधान्य यांचा विचार करून प्रत्यक्ष घर कसे निवडले आणि चांगले शेजारी शोधण्यासाठी काय केले त्याविषयी...