

Kamathipura Book
esakal
स्वाती दामले
कामाठीपुरा, तिथले रस्ते, तिथे राहणारे अठरापगड विविध जाती-धर्माचे लोक, रेड लाइट एरिया म्हणून असलेली कुप्रसिद्धी आणि अशा साऱ्या वातावरणात आपला आब सांभाळून राहणारे पांढरपेशे मध्यमवर्गीय या साऱ्यांचा, विविध रंगांच्या पोतांचा एक सुरेख कोलाज लेखकाने क्लोज एन्काउंटर्स या पुस्तकात रंगविला आहे. विशेष म्हणजे पुस्तकाचे मुखपृष्ठही लेखकाने स्वतः चितारलेले आहे. अतिशय साधी, सोपी, ओघवती, रसाळ, चित्रमय भाषा हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य.