Premium|Coffee Culture Around the World : जगभरातील कॉफीकथा; भावना आणि परंपरांची गोष्ट

Coffee Stories : कॉफीचा अर्थ प्रत्येक संस्कृतीत वेगळा आहे. कुठे ती रोजच्या धावपळीतला विरंगुळा, कुठे पाहुणचार, तर कुठे मैत्री, परंपरा, आठवणी आणि नात्यांना जोडणारी भावना आहे.
Coffee Culture Around the World

Coffee Culture Around the World

esakal

Updated on

मयूर कुलकर्णी

कॉफी तर जगभरात सगळीकडे प्यायली जाते, मग प्रत्येक कॉफीमध्ये वैविध्य काय? जगभरातल्या ‘कॉफीकथा’ ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे कॉफीकडे लोक फक्त कॉफी म्हणून बघत नाहीतच; इटलीमध्ये कॉफी म्हणजे रोजच्या धावपळीतला छोटासा ब्रेक, इथिओपियामध्ये लोकांना एकत्र आणणारा अनुभव, तुर्कीएमध्ये पाहुणचार आणि परंपरेचं प्रतीक, जपानमध्ये बारकाईनं केलेलं काम, व्हिएतनाममध्ये मित्रांसोबत बसून वेळ घालवण्याचा एक बहाणा, आणि भारतात, विशेषतः घरच्या चवीची आठवण... म्हणूनच कॉफी फक्त एक पेय नाहीच, ती एक भावना आहे...

कॉफी या पेयाचा अर्थ जगभरातल्या प्रत्येक माणसासाठी वेगवेगळा असतो. काही लोकांसाठी कॉफी म्हणजे दिवसाची सुरुवात असते, काहींसाठी ती मित्रांसोबत बसून गप्पा मारण्याचं एक कारण असतं, कुणासाठी ती घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत असतं, तर कुणासाठी दिवसभराच्या धावपळीत मिळालेला स्वतःसाठीचा छोटासा ब्रेक असतो. जगभरातल्या कॉफी संस्कृतीकडे पाहिलं, तर एक गोष्ट लक्षात येते - लोक फक्त कॅफीनसाठी कॉफी पीत नाहीत. त्या एका कपाबरोबर त्यांच्या आठवणी, परंपरा, नाती आणि भावना जोडलेल्या असतात. कधीकधी कॉफीपेक्षा त्या कॉफीमागची गोष्ट जास्त महत्त्वाची असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com